परभणी : मानवत शहरात महिलेला दोरीने बांधून चोरी | पुढारी

परभणी : मानवत शहरात महिलेला दोरीने बांधून चोरी

मानवत; पुढारी वृत्तसेवा : मानवत शहरामध्ये मुख्य रस्त्याला लागून असलेल्या साई प्लाझा या संकुलातील एका घरात महिलेला दोरीने बांधून चोरट्याने चोरी केली. ही घटना आज (दि.६) सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की. मानवत येथील साई प्लाझा या १४ सदनिका असलेल्या ठिकाणी दुसऱ्या मजल्यातील सोमनाथ कडतन यांच्या सदनिकेत सायंकाळी ५ .३० ते ६ च्या दरम्यान दोन -तीन अज्ञात चोरटे घुसले. त्यांनी या घरात असलेल्या सोमनाथ कडतन यांच्या सुनबाईला दोरीने बांधून आतून दार लावून घेतले.  सोमनाथ कडतण यांच्या पत्नी घराच्या स्टेरेजवर सायंकाळी फिरण्यासाठी गेल्या असता खाली आल्यावर त्यांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ आवाज देऊनही दार न उघडल्याने त्यांनी नातेवाईकाला बोलून घेत दरवाजा तोडला. त्यावेळी त्यांच्या सुनबाईला दोरीने बांधून चोरट्यांनी चोरी केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी या घटनेबाबत पोलिसांशी संपर्क केला. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक किशोर गावंडे व पोलीस हवालदार मुन्नू शेख , गृह रक्षक दलाचे गोविंद दहे व अन्य पोलीस कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले . व त्यांनी घटनेची पाहणी करत याबाबत गुन्हा दाखल केला.

हेही वाचा :

Back to top button