कौसडी; पुढारी वृत्तसेवा : जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील लाभार्थ्यांनी तहसीलदार यांच्याकडे धाव घेत स्वस्त धान्य दुकानदाराची चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे. येथील स्वस्त धान्य दुकानदार कैलास किसनबुवा गिरी शासनाकडून लाभार्थ्यांसाठी आलेल्या राशनचे धान्य काळ्या बाजारात विक्री करत असून लाभार्थ्यांचे अंगठे घेऊन त्यांना राशनचे धान्य देत नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे.
संबंधित बातम्या :
स्वस्त धान्य दुकानदार राशनचे गहू, तांदूळ हे गावातील किराणा दुकानावर विक्री करत आहे. गोरगरिबांसाठी आलेला राशनचा धान्य काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचा लाभार्थ्यांकडून आरोप करण्यात आला आहे. स्वस्त धान्य दुकानदार कैलास किसनबुवा गिरी याची चौकशी करून कडक कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन दिनांक २० सप्टेंबर रोजी जिंतूर तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले आहे. या निवेदनावर संजय शर्मा, रूपाली गिरी, सुनिता झरकर, पद्मा डागा, कोमल मोरे, भगवान लगड, गोपाळ लगड, गजानन काकडे, बुवाजी जीवने, धुराजी जीवने, यशवंतराव देशमुख, प्रसाद गायकवाड, माऊली बारवकर, शाम सूर्यवंशी यांच्यासह इतर लाभार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
हेही वाचा :