Maratha Reservation : परभणी : आता गावोगावी घुमणार मराठा आरक्षणाचा एल्गार | पुढारी

Maratha Reservation : परभणी : आता गावोगावी घुमणार मराठा आरक्षणाचा एल्गार

परभणी ; पुढारी वृत्‍तसेवा जिंतूर-तालुक्यातील मराठा समाजाचा आरक्षण Maratha Reservation लढा तीव्र करण्यासाठी गावोगावी जाऊन जणजागृती करण्यात येत आहे. गावकऱ्यांच्या भेटीनंतर शहरातील तहसील कार्यालयात साखळी उपोषण करण्यात येणार आहे. मराठा समाजाच्या बैठकीत एक मुखाने आरक्षणाचा एल्गार पुकारण्यात आला असून, गावोगावी भेटीला सुरुवात करण्यात आली आहे.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला Maratha Reservation ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे यासाठी मनोज जरांगे यांनी तब्बल 17 दिवस उपोषण केले होते. यावेळी राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी एक महिन्याची मुदत मागितली होती. ही मुदत 14 ऑक्टोबर रोजी संपत आहे. म्हणून पुढील दिशा काय असणार आहे यासाठी तालुक्यातील गावागावात जाऊन जनजागृती करण्यात येत आहे. दरम्यान गावभेटी नंतर शहरातील तहसील कार्यालयात दररोज वेगवेगळ्या गावातील नागरिकांचे साखळी उपोषण करण्यात येणार आहे. यासाठी गावकऱ्यांशी चर्चा करण्यात येत आहे.

आंदोलनाची Maratha Reservation पुढील दिशा ठरवण्यासाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा येत्या काही दिवसात जिंतूर शहरात होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

हेही वाचा : 

Back to top button