नांदेड: श्रीक्षेत्र माहूरगड येथे नवरात्र उत्सवास प्रारंभ

नांदेड: श्रीक्षेत्र माहूरगड येथे नवरात्र उत्सवास प्रारंभ

माहूर;पुढारी वृत्तसेवा : आजपासून सर्वत्र शारदीय नवरात्र उत्सवाला सुरूवात होत आहे. यानिमित्त श्रीक्षेत्र माहूरगड येथेही नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला आहे. २६ सप्टेंबर २०२२ ते ५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत चालणाऱ्या या उत्सवाची माहूर तालुका प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे.

प्रशासनाने भाविकांच्या सोई सुविधा आणि सुरक्षेवर मोठ्या प्रमाणात भर दिला आहे. शारदीय नवरात्र उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांची वाहनांची पार्किंग व्यवस्था माहूर शहरातील मातृतीर्थ रोडवर ग्यान्बाजी केशवे विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आली आहे. याठिकाणी मनपाकडून नाममात्र पार्किंग शुल्क आकारण्यात येणार आहे. तर नगर पंचायत प्रशासनातर्फे माहूर टी पॉइंट येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

या नियंत्रण कक्षाचे उद्घाटन उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर नाना लाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकीरण पूजार, तहसीलदार किशोर यादव, मुख्याधिकारी डॉ. राजकुमार राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार, न.प. कार्यालय अधीक्षक वैजनाथ स्वामी स्वच्छता निरीक्षक गंगाधर दळवी, नगरसेवक प्रतिनिधी राजू सौंदलकर, नगरसेवक विजय कामटकर आदी उपस्थित हाेते.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news