जालना : जांब समर्थ येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

जालना : जांब समर्थ येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

घनसावंगी; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे- पाटील हे सहा दिवसापासून आमरण उपोषणास बसले आहेत. सहा दिवसापासून त्यांनी अन्न-पाणी सोडल्याने त्यांची प्रकृती खालावली असून सकल मराठा समाज सरकार विरोधात आक्रमक झाला आहे. याप्रकरणी सरकारच्या निर्षेधार्थ आज (दि.३०) सकाळी १० ते २ पर्यंत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी जांब समर्थ येथे अंबड ते पाथरी रोडवरील काही टायरी व लाकडे जाळून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मराठा आंदोलनाप्रकरणी शासनाने दखल न घेतल्यास येथील रस्ता जेसीबीने उखडून आंदोलन करण्यात येईल, असाही इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर जांब समर्थ येथे आमरण उपोषणही करण्यात येणार असून यासाठी सकल मराठा समाज बांधवांचा पाठिंबा आहे. येथील रस्त्यावर असंख्‍य वाहनांच्‍या रांगा लागल्‍या होत्‍या, मात्र अॅम्‍ब्‍यूलन्‍सला वाट मोकळी करून देण्‍यात आली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news