‘उद्रेक थांबवा नाहीतर वेगळा निर्णय घेईल’, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा | पुढारी

'उद्रेक थांबवा नाहीतर वेगळा निर्णय घेईल', जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा सत्ताधाऱ्यांबद्दल गैरसमज झाला आहे, असे मंत्री उदय सामंत  म्हणाले होते. यावर बोलताना सामंत यांना आताच जोर आला आहे का? असा सवाल करत जाळपोळ दगडफेकीत तुमचे चार लोक निघाले तर तुम्ही काय कराल असा सवाल उपस्थित केला. तसेच काही सत्ताधारीच आमचे घर जाळा म्हणून सांगत आहे असा पलटवर देखील त्यांनी मंत्री उदय सामंत यांच्यावर केला. ठीक आहे सामंत म्हणत असतील आमचा गैरसमज झाला तर मी माझे शब्द मागे घेतो, असेही जरांगे म्हणाले. मात्र कोणत्याही  उद्रेक थांबवा, अन्यथा मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.

राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जाळपोळ आणि तोडफोड होत आहे. आमचे आंदोलक शांततेत आंदोलन करत असून सत्ताधाऱ्यांचेच लोक आंदोलन चिघळवण्यासाठी हा प्रकार करत असल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. या जाळपोळीमागे कोण आहे?  याचा मी शोध घेतो असेही जरांगे-पाटील म्हणाले. जाळपोळीला माझं समर्थन नाही. आजपासून जाळपोळ तोडफोड बंद झाली पाहिजे. अन्यथा मला उद्या दुसरा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा जरांगे यांनी आंदोलकांना दिला आहे.

 जाळपोळ प्रकरणानंतर जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी जाळपोळ घटनेमागे सत्ताधारी असू शकतात असा आरोप केला. सत्ताधाऱ्यांनी कितीही धिंगाणा केला तरी मी आंदोलन थांबवणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला. बीडमध्ये उद्या पुकारण्यात आलेला बंद शांततेत देखील असू शकतो असेही ते म्हणाले. आमदार मुंबईत मराठा आरक्षणाबाबतीत जात असतील तर याचा मला आनंद आहे. तुम्ही अर्ध्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले तर मी आणखी जास्त आंदोलन सुरू करेल, असा निरोप मुख्यमंत्र्यांना द्या असे मंत्री विखे यांचा फोनवरुन सांगितले असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांनी मला पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी आमदार, खासदार यांच्या घरासमोर निदर्शने करायला सांगितले. ते अनुभवी आणि हुशार आहे यात शंका नाही. त्यांचा सल्ला योग्य जरी असला तरी आम्ही नेत्यांच्या घरासमोर जाणार नाही, असे धोरण आपले ठरवले आहे. आमच्या गावात येऊ देणार नाही, असा निर्णय झाल्याने आपलेच सुरू ठेवू असे जरांगे म्हणाले.

हेही वाचलंत का?

Back to top button