जालना : घनसावंगी तालुक्यात मराठा आंदोलक आक्रमक; भाजप कार्यालयावर दगडफेक

जालना : घनसावंगी तालुक्यात मराठा आंदोलक आक्रमक; भाजप कार्यालयावर दगडफेक

घनसावंगी; पुढारी वृत्तसेवा :  मराठा आरक्षणासाठी गेल्या सहा दिवसापासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे – पाटील यांची प्रकृती खालावली आहे. आज आरक्षणाविषयी काहीच ठोस निर्णय न घेतल्याने मराठा आंदोलकांत प्रचंड चीड निर्माण झाली आहे. यामुळे आंदोलक आक्रमक भूमिका घेत आहेत. याच पाश्वभूमीवर आज सोमवारी (दि.३०) दुपारी ४ च्या सुमारास घनसावंगी शहरातील भाजपचे विधानसभा प्रमुख सतीश घाडगे यांच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. आणि कार्यालयासमोर लावलेल्या फलकाचीही तोडफोड करण्यात आली.

तसेच पंतप्रधान मोदी व उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे फोटो फाडून टाकत रोष व्यक्त करण्यात आला. घनसावंगी ते अंबड मार्गावर सूतगिरणी चौकात दोन तास रास्ता रोको करण्यात आला. यावेळी राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
रास्तारोको आंदोलनामुळे दोन्ही बाजूंनी दोन किमी लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान रास्तारोको व दगडफेकीच्या घटनेमुळे संपुर्ण तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून शासनाने तातडीने आरक्षणाचा निर्णय घेण्याची मागणी जोर धरत आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news