‘गरिब मराठ्यांसाठी स्वत:चा जीव सांभाळा’, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचा जरांगे-पाटलांना पाठिंबा | पुढारी

'गरिब मराठ्यांसाठी स्वत:चा जीव सांभाळा', अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचा जरांगे-पाटलांना पाठिंबा

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिला आहे. “गरिब मराठ्यांचे आर्थिक साधने, रोजगार आणि शेतीची दुरावस्था यांसारखे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. जे सोडविणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही असणे अपरिहार्य आहे. पुन्हा एकवेळ आवाहन करतो की, आपला जीव सांभाळा”, असे आवाहन डॉ. प्रकाश आंबेडकरांनी केले आहे.

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगेंना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात आंबेडकर लिहितात, गरिब मराठ्यांच्या आरक्षणासाठी आपण आंदोलन उभं केले. प्रस्थापित निजामी मराठा नेतृत्वाच्या विरोधात समाजात जागृती निर्माण केली. आपण प्रामाणिकपणे छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षि शाहू महाराज, ज्योतिबा फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारांनी शोषणाविरुद्ध लढा उभा केला.

मात्र, समजात लोकांच्या प्रश्नांवर आंदोलन करणारेच राहिले नाहीत तर त्यांची बाजू कोण घेणार? गरिब मराठ्यांना आपला फार मोठा आधार वाटत आहे. त्यामुळे आपण स्वत:चा जीव सांभाळावा, असे आवाहन प्रकाश आंबेडकरांनी जरांगे पाटलांना केले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button