मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी | पुढारी

मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी

घनसावंगी; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांना सरकारने झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी मागणी सकल मराठा समाज बांधवांकडून करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन अप्पर पोलिस महासंचालक संजय सक्सेना, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, जालनाचे पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांना दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी उपोषणाकरीता बसलेले असून गेल्या सात दिवसांपासून राज्यातील अनेक पक्षांच्या नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली आहे. या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज झाला होता, त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले असून महाराष्ट्रातील मराठा समाज पेटून उठला आहे. अशा परिस्थितीमध्ये समाजातील काही समाजकंटकांकडून मनोज जरांगे पाटील यांच्या जिविताला हानी पोहचू शकते व तसा काही अनुचित प्रकार घडला तर महाराष्ट्रातील मराठा समाज पेटून ऊठेल. महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवीताचे रक्षण करण्यासाठी त्यांना तात्काळ झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा : 

Back to top button