Maratha reservation | मराठा आंदोलनावेळी पोलिसांच्या फायरिंगमध्ये तरुणाच्या शरीरात घुसले ११ छर्रे | पुढारी

Maratha reservation | मराठा आंदोलनावेळी पोलिसांच्या फायरिंगमध्ये तरुणाच्या शरीरात घुसले ११ छर्रे

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलन चिडण्यासाठी पोलिसांनी अमानुष लाठीहल्ल्या केला. तसेच छर्रे फायरिंग केली. यामध्ये अनेक तरुण, तरुणी, महिला, पुरुष जखमी झाले आहेत. अंबड तालुक्यातील रेनापुरी येथील २३ वर्षीय आकाश कवडे तरुण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांच्या फायरिंगमध्ये त्याच्या शरीरात ११ छर्रे घुसले होते. (Maratha reservation)

त्याच्या शरीरातील ५ छर्रे स्थानिक रुग्णालयात काढण्यात आले होते. त्याला त्रास जाणवल्याने तो छत्रपती संभाजीनगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. तपासणी केल्या असता त्याच्या खांद्यावर २ छर्रे, मनगटात १ छर्रा, छातीमध्ये १ छर्रा, उजव्या बागलेत २ छर्रे तर कानाच्या वर डोक्यामध्ये १ छर्रा असे ७ छर्रे असल्याचे निष्पन्न झाले. आज (दि.६) हे सर्व छर्रे ऑपरेशन करून काढण्यात येणार असल्याचे आकाश कवडे याने सांगितले.

आकाश कवडे कृषी पदविकाधारक असून तो वडीगोद्री येथे खत, बी- बियाणे व औषधी दुकान चालवतो. लाठीहल्ला आणि दगडफेक याच्याशी त्याचा कोणताही संबंध नाही. नेहमीप्रमाणे तो सायंकाळी दुकान बंद करून रेणापुरी गावाकडे दुचाकीवरून निघाला होता. अंतरवाली सराटी येथे आल्यावर अमानुष लाठीहल्ला सुरू होता. त्यावेळी गोंधळ वाढला. धावपळ झाली, फायरींग झाली. त्यात आकाश कवडे याच्यावर फायरींग झाल्याने त्यात तो जखमी झाला. (Maratha reservation)

हेही वाचा 

Back to top button