कोल्‍हापूर : मराठा आंदोलकांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ मुरगुडात कडकडीत बंद व निषेध मोर्चा! | पुढारी

कोल्‍हापूर : मराठा आंदोलकांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ मुरगुडात कडकडीत बंद व निषेध मोर्चा!

मुरगूड : पुढारी वृत्तसेवा आंतरवाली सराटी (जालना) येथील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्याच्या निषेधार्थ आज (बुधवार) सकल मराठा समाजाच्या वतीने मुरगुडात कडकडीत बंद पाळण्यात आला. मराठा व इतर समाजाच्या वतीने शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला.

मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर जो अमानुषपणे लाठीहल्ला झाला याच्या निषेधार्थ मुरगूडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्व व्यवहार त्यामूळे ठप्प झाले होते. शाळा-महाविद्यालये व संस्थांनीही आपले कामकाज बंद ठेवून या घटनेचा निषेध केला.

मराठा आंदोलकांवर पोलीसाकडून जो लाठीहल्ला झाला, या निंदनीय घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. यावेळी शिवतीर्थावरुन निषेध मोर्चा काढण्यात आला . येथील हुतात्मा तुकाराम चौकात या निषेध मोर्चाचे निषेध सभेत रुपांतर झाले. यावेळी ओंकार पोतदार, नामदेव भराडे, विकी साळोखे ‘मारुती चौगले’ चंद्रकांत जाधव, संजय भारमल यांची निषेधपर भाषणे झाली.

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. तोपर्यंत मागे हटायचे नाही असे आवाहन करुन प्रसंगी तीव्र लढा उभारून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात माजी नगराध्यक्ष नामदेव मेंडके ‘माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले ‘ बजरंग सोनुले, धनाजी गोधडे, रणजित सुर्यवंशी, दत्तात्रय मंडलिक ‘सजैराव भाट, आनंदा मांगले, गजानन साळोखे, अमर देवळे, विजय गोधडे, दिगंबर परीट या प्रमुखासह मराठा व इतर समाजाचे कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हेही वाचा : 

Back to top button