रेती घाटामध्ये अवैध वाळू उपसा

crime
crime

आखाडा बाळापूर; पुढारी वृत्तसेवा : आखाडा बाळापुर पासून कयाधू नदी च्या डोंगरगाव, सापळी धावंडा या ठिकाणी रात्री अनधिकृत वाळू उपसा सुरू आहे. विनापरवाना वाळू उपसा करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असताना महसूल विभागाकडून मात्र तोकड्या कारवाया सुरू आहेत.

कयाधू नदी परिसरात अनधिकृत वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एका व्यावसायिकाच्या परवानगी पावतीवर दिवसभर नदीपात्रातून वाळू उपसा केला जातो. रात्रीच्या वेळी तर या परिसरात वाळू माफियांचेच राज्य असल्याने बिनधास्तपणे वाळू उपसा सुरू असतो. शंभरहून अधिक ट्रक्टर वाळू वाहतुकीसाठी असतात. यावर महसूल विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. पोलिसांकडूही ठरावीक वेळीच गस्त असते. त्‍यामुळेच वाळू उपसा व्यवसाय तेजीत असल्याची चर्चा सुरू आहे.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news