परभणी : वीज जोडणीप्रश्‍नी शेतकर्‍यांचा आंदोलनाचा इशारा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

चारठाणा ; पुढारी वृत्तसेवा :  चारठाणा ( ता.जिंतूर) येथील शेतकऱ्यांनी कृषी पंपाच्या वीज जोडणीसाठी महावितरणाकडे  कोटेशनची रक्कम भरली होती. तरीही वीजजोडणी मिळाली नाही. स्वतंत्र डीपी मिळणार, या आशेने शेतकऱ्यांनी नवीन बोअर- विहीर खोदली . पुरेशी वीज उपलब्ध होऊन सिंचनासाठी फायदा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र कोटेशन भरून दोन वर्ष लोटूनही स्वातंत्र डीपी मिळाला नाही. मुबलक पाणी असूनही शेतकऱ्यांना पाण्याचा फायदा घेता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

शासनाने निधी मंजूर केल्यानंतर टेंडर निघेल, त्यानंतर शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्म मिळेल, अशी माहिती देत महावितरण टाळाटाळ करण्यात येत आहे. कृषी पंपाकरिता वीज जोडणी मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी दोन वर्षापूर्वी महावितरणाच्या उपविभागीय कार्यालयाकडे रीतसर अर्ज सादर करत कोटेशन भरले आहे. बोअरला पाणी आहे. मात्र वीज जोडणी नसल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे पाणी असूनही शेतकऱ्यांना त्‍याचा फायदा घेता येत नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.

शेतकरी सय्यद नदीम अक्रम सय्यद मंजूर अहमद या शेतकऱ्याने 2020 मध्ये स्वतंत्र डीपीचे कोटेशन काढून पैशाच्या भरणा केला; परंतु टेंडर न निघाल्याचे महावितरणकडून सांगण्‍यात येत आहे. या प्रश्‍नाची महावितरणाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा शेतकऱ्यांकडून दिला जात आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news