पिंपळनेर : पंचायत समिती साक्री मार्फत “ग्राम बाल संरक्षण समिती” कार्यशाळा | पुढारी

पिंपळनेर : पंचायत समिती साक्री मार्फत "ग्राम बाल संरक्षण समिती" कार्यशाळा

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील धोंगडे दिगर आश्रम शाळा येथे पंचायत समिती साक्री मार्फत “ग्राम बाल संरक्षण समिती” कार्यशाळा राबविण्यात आली.
धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रेरणेतून साक्री तालुक्यातील धोंगडे दिगर आश्रम शाळा येथे पंचायत समिती साक्री मार्फत घेण्यात आलेल्या “ग्राम बाल संरक्षण समिती” मार्गदर्शनपर कार्यशाळेस समितीचे अध्यक्ष, सदस्य, पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ नागरिक, पंचमंडळी उपस्थित होते. कार्यशाळेत प्रत्येक बालकाला शिक्षणाचा हक्क असून त्यांना चांगले शिक्षण  मिळावे तसेच त्यांचा संपूर्ण शारीरिक व मानसिक विकास व्हावा, कुपोषणमुक्त राहावेत, बालविवाह प्रतिबंधक उपाययोजना, बालविवाह होऊ नयेत यासाठी समाजाकडून अपेक्षित सहकार्य, मुलींनाही शिक्षणाचा हक्क मिळावा तसेच 18 वर्षापूर्वी विवाह टाळण्याबाबत अशा विविध विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी शिक्षणाचे महत्त्व विषद करून प्रत्येक बालकाला चांगले जीवन जगण्याचा हक्क असून कोणत्याही परिस्थितीत बालविवाह टाळण्यात यावेत यासाठी बाल संरक्षण समितीच्या सदस्यांना आवाहन करत मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सचिन शिंदे व त्यांचा समुह, जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंत भदाणे, खासदार बापूसाहेब चौरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमप्रसंगी पंचायत समितीचे सभापती शांताराम भाऊ कुवर, जि. प. सदस्य पोपटराव सोनवणे, गोकुळ परदेशी, डॉ. नितीन सूर्यवंशी, खंडूशेठ कुवर, धिरज अहिरे, जिल्हा परिषद सदस्य सुधा गांगुर्डे, अनिता चौरे, सुमित्रा गांगुर्डे, लताताई पवार, सभापती प्रतिभा सूर्यवंशी, पं. स सदस्य भारुडे, धुडकू कल्पना चौरे, सोनू सूर्यवंशी, पं. स. स्तरावरील सहाय्यक गट विकास अधीका-यांसह सर्व खातेप्रमुख, विस्तार अधिकारी, पं. समीती स्तरावरील संपूर्ण समुि उपस्थित होते. प्रतिभा चौरे यांनी प्रस्तावना व सूत्रसंचालन केले. गटविकास अधिकारी जे. टी सूर्यवंशी यांनी आभार मानले.

हेही वाचा:

Back to top button