Sambhajinagar News : सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपकेंना मातोश्रीचे निमंत्रण

शिनसेना नेते खैरे यांनी घेतली भेट, ठाकरे यांनी साधला मोबाईलवरून संवाद
Abhijit Dipke on CJP protest
Sambhajinagar News : सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपकेंना मातोश्रीचे निमंत्रणPudhari
Published on
Updated on

Shiv Sena leader Khaire met Abhijit Dipke; Thackeray spoke with him over the phone

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील आंदोलनानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे छत्रपती संभाजीनगरमध्ये परतलेले अभिजीत दीपके यांना आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आमंत्रित केले आहे. गुरुवारी (दि.३०) सेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दीपके यांची बजाजनगर येथील त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यानच मोबाईलवरून पक्षप्रमुख ठाकरे व दीपके यांच्यात संवाद झाल्याचे खैरे यांनी सांगितले.

Abhijit Dipke on CJP protest
Marathwada Rain : मराठवाड्यात दमदार पाऊस

दिल्ली येथे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे नाव संपूर्ण देशात गाजवल्याबद्दल आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा लढा यशस्वी केल्याबद्दल अभिजीत दीपके यांचा माजी खासदार खैरे यांनी गौरव केला. ही बाब अभिमानास्पद असून, इतिहासात नोंदविली जाईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. याभेटीत खैरे यांनी दीपके कुटुंबीयांसोबत बराच वेळ चर्चा केली. त्यानंतर शिवसेना नेते खैरे यांच्या मोबाईलवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोन करीत अभिजीत दीपकेशी संवाद साधला. त्यांनी दीपके यांना मुंबईत मातोश्रीवर भेटीस येण्याचे आमंत्रण दिले आहे.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी अभिजीत दीपके यांच्या आई-वडिलांशी संवाद साधत त्यांचेही कौतुक केले. दरम्यान, यावेळी अभिजीत दीपके यांच्या आई-वडिलांनी चंद्रकांत खैरे यांच्या खासदारकीच्या कार्यकाळात केलेल्या मदतीची आठवण करून देत जुन्या समृतींना उजाळा दिला.

Abhijit Dipke on CJP protest
NEET Result : 'नीटचा' निकाल योग्यच; फेरपरीक्षेला आव्हान देणाऱ्या याचिका खंडपीठाने फेटाळल्या

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद धीवर, तालुकाप्रमुख विष्णू जाधव, शहरप्रमुख विशाल खंडागळे, माजी ग्रामपंचायत सदस्य बजरंग पाटील, विभागप्रमुख अशोक कटारे, यशवंत चौधरी, शाखाप्रमुख राजू चव्हाण, खेडकर, ओंकार देशमुख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news