Vaijapur Petrol Diesel Shortage : वैजापुरात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा

पंपांवर वाहनांच्या रांगा; प्रवासी, मालवाहतूक धारकांना फटका
Vaijapur Petrol Diesel Shortage
वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील पेट्रोल पंपावर इंधनासाठी वाहनधारकांची झालेली गर्दी.pudhari photo
Published on
Updated on

वैजापूर : युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवड्याची भीती निर्माण झाल्याने वैजापूर तालुक्यात पेट्रोल व डिझेलसाठी वाहनधारकांनी पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी केली आहे. शनिवारी तालुक्यातील अनेक पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले.

तालुक्यातील काही पेट्रोल पंपांवर इंधन संपल्याचे फलक लावण्यात आले होते, तर ज्या ठिकाणी पेट्रोल व डिझेल उपलब्ध होते त्या पंपांवर वाहनधारकांनी मोठी गर्दी केली. अचानक वाढलेल्या मागणीमुळे इंधन पुरवठ्यावर ताण निर्माण झाला आहे.

Vaijapur Petrol Diesel Shortage
Ratnagiri News : दापोली तालुक्यावर मोठे इंधन संकट

खरीप हंगामाची तयारी सुरू असल्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व अन्य कृषी कामांसाठी डिझेलची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासत आहे. मात्र तुटवड्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय मालवाहतूक,प्रवासी वाहतूक तसेच खासगी वाहनधारकांनाही या परिस्थितीचा फटका बसत आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका

दरम्यान, इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती पेट्रोल पंप चालकांनी दिली. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून अतिरिक्त इंधन खरेदी करू नये, असे आवाहन प्रशासन व पंप चालकांकडून करण्यात आले आहे.

Vaijapur Petrol Diesel Shortage
शिरपुर येथे पेट्रोल टंचाई; दोनच पंप सुरू असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news