Chhatrapati Sambhajinagar fire: भाग्योदय अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजच्या गोडाऊनला भीषण आग...

आगीमुळे झालेल्या नुकसानीचा नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही
Vaijapur fire incident
Published on
Updated on

वैजापूर: तालुक्यातील घायगावजवळ असलेल्या भाग्योदय अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजच्या जिनिंगमधील गोडाऊनला सोमवारी (दि. १७) पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात बारदानांचा साठा असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले.

Vaijapur fire incident
Vaijapur fire news: शिऊर बंगला येथे भीषण आग; सात ते आठ दुकाने जळून खाक, लाखोंचे नुकसान
Vaijapur fire incident
Vaijapur News : नैसर्गिक नाला बुजवून प्लॉटिंग; महसूल विभागाकडून पंचनामा

आगीची तीव्रता वाढत गेल्याने गोडाऊनमधील बारदाने मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. आग आटोक्यात आणण्यासाठी गोडाऊनचे पत्रे व इतर भाग जेसीबीच्या सहाय्याने हटविण्याचे कामही करण्यात आले.

Vaijapur fire incident
Vaijapur News : अधिकारी नसताना सायरनची दणदणाट!

या आगीत भाग्योदय अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजच्या जिनिंगचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीमुळे झालेल्या नुकसानीचा नेमका आकडा समोर आलेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news