Vaijapur News : नैसर्गिक नाला बुजवून प्लॉटिंग; महसूल विभागाकडून पंचनामा

वैजापूर : अहवाल वरिष्ठांकडे सादर होणार, कारवाई काय होणार याकडे लक्ष
Vaijapur News
Vaijapur News : नैसर्गिक नाला बुजवून प्लॉटिंग; महसूल विभागाकडून पंचनामाfile photo
Published on
Updated on

Vaijapur News: Plotting on natural drain; Panchnama from Revenue Department

वैजापूर, पुढारी वृत्तसेवा : वैजापूर ग्रामीण येथील सर्व्हे क्रमांक १९७ मधील नैसर्गिक नाला बुजवून प्लॉटिंग उभारल्याच्या प्रकरणाची महसूल प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर तलाठ्यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला असून, त्याचा सविस्तर अहवाल उपविभागीय अधिकारी (महसूल) यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.

Vaijapur News
Sambhajinagar News : शहरातील प्रमुख रस्त्यांवरील जीवघेणे खड्डे बुजवा

पंचनाम्यात नमूद केल्यानुसार, सर्व्हे क्रमांक १९७ मधून पूर्व-पश्चिम दिशेने जाणारा नैसर्गिक नाला सिमेंट पाईप टाकून अंशतः बुजविण्यात आला आहे. टाकण्यात आलेला पाईप हा नाल्याचा संपूर्ण पाण्याचा प्रवाह वाहून नेण्यासाठी अपुरा असल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून परिसरातील शेतजमिनी व नागरिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

पंचनाम्यात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे की, सर्व्हे क्रमांक २०० मधील बांधकामामुळेही नैसर्गिक नाल्याच्या प्रवाहावर परिणाम होण्याची शक्यता नोंदविण्यात आली आहे.

Vaijapur News
Youth Murder Case : सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, गुन्हे शाखेचे पोलिस तळ ठोकून

या बांधकामामुळे पाण्याचा नैसर्गिक मार्ग बदलत असून भविष्यात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका नाकारता येत नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. आता या प्रकरणात प्रशासनाकडून पुढे कोणती कारवाई होते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news