Vaijapur News : अधिकारी नसताना सायरनची दणदणाट!

एसडीएमच्या गाडीत कर्मचाऱ्यांचा ‌‘झिंगाट‌’; वैजापुरात सरकारी वाहनाच्या गैरवापराची चर्चा
Vaijapur News
अधिकारी नसताना सायरनची दणदणाट!pudhari photo
Published on
Updated on

नितीन थोरात

वैजापूर ः सायरनचा आवाज म्हणजे आपत्कालीन परिस्थिती किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती, अशी सर्वसामान्यांची धारणा असते. मात्र वैजापूरमध्ये शनिवारी (दि. 6) घडलेल्या एका प्रकाराने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उपविभागीय अधिकारी (एसडीएम) वाहनात नसतानाही त्यांच्या शासकीय वाहनातून सायरन वाजवत काही कर्मचारी शहरात फिरल्याचा प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैजापूरचे उपविभागीय अधिकारी अरुण जऱ्हाड हे मागील चार महिन्यांपासून रजेवर असून त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार एकनाथ बंगाळे यांच्याकडे आहे. शनिवारी शासकीय सुट्टी असतानाही एसडीएमचे वाहन शहरात फिरताना दिसले. वाहनात कार्यालयातील कर्मचारी आणि खासगी चालक असल्याची माहिती आहे.

Vaijapur News
Sindhudurg Protest : अन्यायकारक स्मार्ट मीटर लादता, ग्राहकांचे प्रश्न सोडविणार कोण?

पुढारीच्या प्रतिनिधीने केलेल्या पडताळणीत वैजापूर-गंगापूर मार्गावरून शहरात प्रवेश करताना वाहनाचा सायरन सुरू असल्याचे दिसून आले. शहरात आल्यानंतर सायरनचा आवाज आणखी वाढविण्यात आला. विशेष म्हणजे, या संपूर्ण काळात वाहनात कोणताही अधिकारी उपस्थित नव्हता.अधिकारी नसताना सायरन कोणाच्या आदेशाने व कोणत्या कारणासाठी वाजविण्यात आला, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

सरकारी वाहन आणि सायरनचा वापर लोकसेवेसाठी की रुबाब मिरविण्यासाठी, अशी चर्चा शहरभर रंगली असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.पानटपरीसमोरही सायरनचा गजरउपविभागीय अधिकाऱ्यांच्या शासकीय बंगल्यालगत असलेल्या एका पानटपरीजवळ संबंधित वाहन काही काळ उभे होते. यावेळी वाहनावरील सायरनही सुरूच असल्याचे नागरिकांनी सांगितले.

Vaijapur News
Sindhudurg News : सावंतवाडीत दिवसातून १० ते १२ वेळा वीज पुरवठा खंडित

आपत्कालीन परिस्थिती किंवा अधिकृत कामकाजासाठी वापरला जाणारा सायरन पानटपरीसमोर उभ्या वाहनावर नेमका कोणत्या कारणासाठी सुरू ठेवण्यात आला, याबाबत नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणीही सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.

सायरनचा रुबाब की नियमांचा भंग?

अधिकारी अनुपस्थित असताना शासकीय वाहनातून सायरन वाजविणे कितपत योग्य, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून या प्रकाराची चौकशी होऊन जबाबदारांवर कारवाई होते का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

काय म्हणाले प्रभारी एसडीएम? सध्या हे वाहन माझ्याच ताब्यात आहे. शनिवारी सायंकाळी मी शासकीय वाहनात नव्हतो. संपूर्ण प्रकाराची माहिती घेत असून, असा प्रकार घडला असल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल.

एकनाथ बंगाळे, प्रभारी उपविभागीय अधिकारी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news