छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : येथील बाबा चौकातील आयसीआयसीआय बँकेतून पैसे काढून निघालेल्या व्यवसायिक नवाब जमीर खान पठाण यांची तीन लाख रुपयाची बॅग चोरांनी लंपास केली. सोमवारी दुपारी तीन वाजता क्रांतीचौक पेट्रोल पंपावर ही घटना घडली. रात्री उशिरा या प्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पठाण सोमवारी बँकेत गेले होते, तीन लाख रुपये घेऊन ते दुचाकीने घराच्या दिशेने निघाले. मात्र क्रांतीचौकात जाताच दुचाकी पंक्चर झाली. बँकेपासूनच चोर त्यांचा पाठलाग करत होते. क्रांतीचौकात पेट्रोल पंपावर पंक्चर काढण्यासाठी थांबल्यावर चोरट्यांनी बॅग घेवून पोबारा केला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पंक्चर दुरुस्त करणाऱ्याला पैसे देताना त्यांनी पैशाची बॅग दुचाकीवर ठेवली आणि ती संधी चोरांनी साधली. पुढे मोंढा, आकाशवाणी, उस्मानपुरातील, लिंक रोड वाळूज मार्गे चोर शहरा बाहेर पडले. एकाने हेल्मेट तर दुसऱ्याने मास्क घातला होता.
हेही वाचा :