Shirish Kanekar Passed Away : ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांचे निधन; वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Shirish Kanekar Passed Away : ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांचे निधन; वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर (Shirish Kanekar Passed Away) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज, मंगळवारी (दि. 25) सकाळी प्रकृती खालावल्यामुळे त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाल्याचे समजते आहे.

शिरीष कणेकर यांचा जन्म ६ जून १९४३ रोजी पुणे येथे झाला. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पेण हे कणेकरांचे मूळ गाव होय. त्यांचे वडील रेल्वेमध्ये डॉक्टर होते. त्यामुळे कणेकरांचे लहानपण भायखळ्याच्या रेल्वे रुग्णालयाच्या सरकारी निवासस्थानामध्ये गेले. मुंबई विद्यापीठातून ते बी.ए.एल्‌एल्‌बी. झाले. मराठी लेखक, पत्रकार व कथनकार म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. ते विनोदी लेखन व क्रीडा पत्रकारिता यासाठीही ख्यातनाम होते. त्यांचे कणेकरी, माझी फिल्लमबाजी हे विनोदी कथनाचे कार्यक्रम विशेष गाजले आहेत. क्रिकेट व चित्रपटसृष्टीतल्या गमती-जमती हे त्यांच्या एकपात्री कथनाच्या कार्यक्रमातील व लिखाणातील आवडीचे विषय होते. त्यांनी मुक्त पत्रकार म्हणून वृत्तपत्रांतून स्तंभलेखनही केले.

कणेकर यांचे प्रकाशित साहित्य :

क्रिकेट-वेध (१९७७) : क्रिकेटवर
गाये चला जा (१९७८) : हिंदी चित्रपट संगीतावर
यादोंकी बारात (१९८५) : हिंदी चित्रपट व्यावसायिकांची व्यक्तिचित्रे
पुन्हा यादोंकी बारात (१९९५) : हिंदी चित्रपट व्यावसायिकांची आणखी व्यक्तिचित्रे
ते साठ दिवस (१९९७) : प्रवासवर्णन
डॉलरच्या देशा (२००२) : प्रवासवर्णन
रहस्यवल्ली (१९८६) : रहस्यकथा

कणेकर यांची रंगमंचीय कारकीर्द

रंगमचावर पदार्पण : ७ नोव्हेंबर १९८७, स्थळ : दीनानाथ नाट्यगृह, मुंबई.
भारतीय रंगमंचावर 'स्टॅन्ड अप कॉमेडी' प्रथम आणली.
'माझी फिल्लमबाजी', 'फटकेबाजी' व 'कणेकरी' या तीन एकपात्री कार्यक्रमांचे लेखन, दिग्दर्शन, निर्मिती व सादरीकरण केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news