

कन्नड; पुढारी वृत्तसेवा : कन्नड तालुक्यातील शेलगाव येथे लग्नाच्या वरातीत डीजे लावण्याच्या कारणावरून दोन गटात राडा झाला. यावेळी दगडविटांसह चाकूचा वापर करण्यात आल्याने अनेक जण जखमी झाले. याप्रकरणी ८० हून अधिक जणांवर पिशोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पाेलिसांनी दहा ते बारा जणांना अटक केली आहे.
शेलगाव येथे फुलंब्री तालुक्यातील लोक लग्नानिमित्त शेलगाव येथे आले होते. वरात सुरू असताना असताना डीजे का लावला, अशी विचारणा करत एका गटाने दुसऱ्या गटातील एकावर चाकूहल्ला केला. यावेळी दोन्ही गटात मोठा राडा झाला. या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया, सपोनि कोमल शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन केले आहे.
हेही वाचा :