Manoj Jarange Patil : "आता केवळ आरक्षणच नाही...." ; दसरा मेळाव्यात जरांगे पाटील यांची मोठी घोषणा

एकनाथ शिंदे, तुम्ही माझ्या नावावर ५०० कोटी रुपये घेतल्याचं खरं आहे का?
Manoj Jarange Patil Dussehra Melava
Pudhari News
Published on: 
Updated on: 

Manoj Jarange Patil Dussehra Melava : आपल्याला ऊन लागलं तरी चालेल, पण समाजाला ऊन लागू द्यायचं नाही. तीन वर्षे आम्ही आरक्षणासाठी संघर्ष करत आहोत. आपण कशासाठी संघर्ष करतोय, याची जाणीव असू द्या. कोणाचा काय शब्दप्रयोग आहे, याचे भान ठेवतो. आता आरक्षणाबरोबरच मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी 'मराठा सेवक' काम करेल, अशी घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज (दि. २० ऑक्टोबर) केली. ते बीड येथील नारायणगडावर आयोजित दसरा मेळाव्यात बोलत होते. समाज संपला तर मराठा उद्ध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही, असा इशाराही त्‍यांनी केली.

प्रमुख 3 मुद्दे...

मराठा सेवक, कुणबी नोंदी आणि एससीबीसी हे प्रमुख 3 मुद्दे मांडत ज्या मराठ्याला मराठा सेवक व्हायचे असेल त्यांच्यासाठी 22 तारखेला मोबाईल नंबर दिला जाईल.) ज्यांच्या कुणबी नोंदी मिळाल्या त्यांचे प्रमाणपत्र दिले जात नाही, सापडलेल्या कुणबी नोंदी आणि त्यासंबंधी सर्व अडचणी संदर्भात एक मोबाईल क्रमांक दिला जाणार. त्या क्रमांकावर केवळ आरक्षणाचे संदर्भात अडचणी सांगायच्या आहे. तसेच मराठा समाजाच्या सगळ्या समस्या आणि अडचणीसाठी अजून एक मोबाईल क्रमांक दिला जाणार असल्‍याचे जरांगे पाटील यांनी जाहीर केले.

Manoj Jarange Patil Dussehra Melava
Manoj Jarange Patil : आंदोलन मोडीत काढून एकटे पाडण्याचा डाव

अजून दोनच महिने राहिले आहेत...

आपला उद्‍देश केवळ मराठा समाजाला मोठे कारायचा आहे, असा निर्धार व्‍यक्‍त करत तुम्ही आधार म्हणून निवडून दिलं तेच तुमच्या विरोधात काम करत आहेत. तीन महिने बोलणार नव्हतो. मी शब्दाला पक्का आहे. तीन महिने काहीच बोलणार नाही. तुम्ही म्हणालात तर पुढचं पाऊल घेतो. आम्ही त्यांना पाटोद्यात शब्द दिलाय. तीन महिन्यातील एक महिना झाला आहे. अजून दोनच महिने राहिले आहेत, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे, तुम्ही माझ्या नावावर ५०० कोटी रुपये घेतल्याचं खरं आहे का?

"जरांगे पाटील यांना ५०० कोटी रुपये द्यायचे आहेत," असं एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतील भाजपचे नेते व महाराष्ट्रातील काही भाजपच्या नेत्यांना सांगितलं. "एकनाथ शिंदे यांनी ५०० कोटी रुपये घेतले, श्रीकांत शिंदे यांनी मला दिले," असा गौप्यस्फोट करत हे खरं आहे का, असा सवाल जरांगे पाटील यांनी केला. नेमकं यातील खरं काय? भाजप आणि तुम्ही, नेमकं कोण खरं बोलतंय? असा सवाल करत मी आजपर्यंत एकत्र पाच हजार रुपये पाहिले नाहीत. मी आज आव्हान केलं आणि राज्यातील प्रत्येक मराठ्याने १०० रुपये दिले, तरी अडीच हजार कोटी रुपये होतील, असेही जरांगे म्हणाले.

Manoj Jarange Patil Dussehra Melava
Manoj Jarange Patil ED: मनोज जरांगेच्या सहकाऱ्यांवर ED चौकशीच्या वादळाचे सावट... गुप्तचर स्तरावर चौकशी सुरू

मराठे कोणाच्या जिवावर नाही

मी जिवंत आहे तोपर्यंत समाजची ताकद वाढवतो. आम्ही मराठे कोणाच्या जिवावर नाही तर आम्ही आमच्याच जिवावर आहे हे दाखवून दिलं आहे. मराठा समाज तुमचं ऐकत होता त्यावेळी तुम्ही त्यांचे वाटोळे केले. तुम्ही तुमची घरे भरली, जमिनी घेतल्या बंगले बांधले. आपला समाज इतका एकवटत नव्हता. आपल्या समाज उन्हात तळपत नव्हता. पाऊस अंगावर घेतला नव्हता. मी इमानदारीने काम करतोय माझ्याच मागे लागले आहेत. मी काय चूक करतोय मी एकही वावगं पाऊल उचलेलं नाही, असेही जरांगे म्‍हणाले.

जो मराठ्यांच्‍या विरोधात जाईल २०२९ ला निवडून द्यायचं नाही

मराठा समाजची लेकरं मोठे करायला बसलो आहे. मी तुमचं ऐकायला बसलेलो नाही. मी माझ्या समाजासाठी भांडायचं नाही. मागणी करायची नाही मग मी समाजाशी धोका करतोय. सरकारसोबत राहतोय मी त्यांच्याशी मैत्री करतोय मी तीन वर्षाच्या काळात कोणालाही बोललेलो नाही. जो नेता मराठ्यांच्या विरोधात जाईल जो पक्ष मराठ्यांच्या विरोधात जाईल त्याला २०२९ ला निवडून द्यायचं नाही. सगळे तयार आहात ना २०२९ मध्ये आता तुम्ही म्हणता तर मी कोणाला मोजतच नाही, असे आव्‍हानही त्‍यांनी दिले.

Manoj Jarange Patil Dussehra Melava
Manoj Jarange Patil Antarwali : आता अंतरवाली सराटीत आंदोलन होणार नाही... मनोज जरांगे पाटील गावातील विरोधावर काय म्हणाले?

शेतकऱ्यांची लढाई देखील लढायची आहे

यंदाचे वर्ष हे दुष्‍काळाचे आहे. मोठी कठीण परिस्‍थिती आहे. आता आपल्या सगळ्यांना ही लढाई लढायची आहे. हाता तोंडाला आलेला सोयाबीन, कापूस गेला. शेतकऱ्याच्या बांधावर देखील उभारू शकत नाही. पाणी लागलं तर तांब्या भरून द्या एकमेकांची मजा बघू नका. सरकारने आता हेक्‍टरी एक लाखांची मदत केलीच पाहिजे, अशी मागणीही त्‍यांनी केली.

पीक विम्‍याचे पैसे जमा करा

सरकार दुष्‍काळसाठी ५ हजार रुपये देईल, पण त्‍यासाठी हेलपाटे मारावे लागतील. हेलपाटे मारण्‍यात एवढा खर्च होतील की पाच हजार रुपायातील एक हजार रुपयेही राहणार नाही. आता दुष्‍काळग्रस्‍त शेतकर्‍यांच्‍या मदत करायला पाहिजे. पीक विम्‍याचे पैसे जमा करा, अशी मागणीही त्‍यांनी केली.

सरकार आपल्‍याविरोधात आहे

सरकार आपल्‍याविरोधात बैठका घेत आहे. ५८ लाख कुणबी नोंद दिल्‍या आहेत. सारथीपासून महामंडळापर्यंत सर्व द्‍या. तुम्‍ही नेमकं कोणाकडून बोलत आहात. माझ्‍याविरोधात कोण काय बोलतय मला महत्त्‍व नाही. ज्‍या दिवशी हाक मारीन त्‍यादिवशी सर्वांनी एकत्र यावे. येथे उपस्‍थित असणार्‍या सर्वांनी प्रत्‍येकी दहा गाड्या काढायच्‍या, असे आवाहनही त्‍यांनी केले.

Manoj Jarange Patil Dussehra Melava
Manoj Jarange Patil | चौकशांना घाबरत नाही, तुरुंगात जायलाही तयार : मनोज जरांगे

पुढील काळात जशास तसे उत्तर देणार

मला किती बदनाम करणार? मी पैसे खाल्ल्याचे आरोप केले जातात. पुढील काळात जशास तसे उत्तर देणार. आमच्याबद्दल बोलताना योग्य तेच बोला, असा इशारा देत गैरसमज कोणी पसरवले तरी हे वाढणार नाही, याची काळजी समाजाने घ्यावी. खोटे गुन्हे दाखल होतील, घाबरू नका. ज्यांच्यावर आज गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. आता दोन वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत आम्ही सत्ताधाऱ्यांना जागा दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news