Manoj Jarange Patil Antarwali : आता अंतरवाली सराटीत आंदोलन होणार नाही... मनोज जरांगे पाटील गावातील विरोधावर काय म्हणाले?

मनोज जरांगे पाटील यांनी दुष्काळ जाहीर करताना सरसकट मदत करा अशी मागणी केली आहे. तसेच आंदोलन आता कुठंही होईल असं सांगत सरकारचं टेन्शन वाढवलं.
Manoj Jarange Patil Antarwali
Manoj Jarange Patil Antarwali pudhari
Published on: 
Updated on: 

Manoj Jarange Patil Antarwali Sarati Protest: मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर येथील रूग्णालयातून आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुष्काळी जाहीर करण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी अंतरवाली सराटीत आता मराठा आंदोलन होणार नाही असं देखील सांगितलं.

Manoj Jarange Patil Antarwali
Manoj Jarange Patil | चौकशांना घाबरत नाही, तुरुंगात जायलाही तयार : मनोज जरांगे

नुकसान भरपाई सरसकट हवी

मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेकडो तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या निर्णयावर भाष्य केलं. त्यांनी सरकारने दुष्काळ जाहीर करताना सरसकट जाहीर करायला पाहिजे. अर्धवट करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसू नये. कर्जमाफी, अनुदान पूर्णपणे शंभर टक्के करणे गरजेच आहे. तसे आता सरकारने जाहीर करायला हवे. हेक्टरी ८० ते ९० हजार ते १ लाख रूपयांपर्यंतची नुकसान भरपाई मिळावी अशी देखील मागणी जरांगे पाटील यांनी केली. तसेच सरकारने पाणी चारा याची देखील तातडीने सोय केली पाहिजे अशी देखील अपेक्षा बोलून दाखवली.

दरम्यान, यंदाचा दसऱ्या मेळाव्याबाबत देखील मनोज जरांगे पाटील यांनी माहिती दिली. ते म्हणाले की यंदाचा दसरा मेळावा हा नारायण गडावर होणार आहे. काल बैठक झाली असून २० ऑक्टोबर रोजी दासरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला सर्वांनी यावे अशी देखील विनंती पाटील यांनी केली.

Manoj Jarange Patil Antarwali
Manoj Jarange Patil: सरकारने काढला जीआर! मोडी-फारसी लिपी वाचकांसाठी घेतला मोठा निर्णय! जरांगे पाटलांचं नेमकं आवाहन काय?

आता अंतरवालीत आंदोलन नाही?

अंतरवाली सराटीमधील हे शेवटचं आंदोलन आहे अशा शब्दप्रयोग वापरण्यात आला होता. याबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आता अंतरवाली सराटी मधील व्यासपीठ आणि सर्व साहित्य काढण्यात आलं आहे. जर सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत तर इथून पुढे पाटोदापासून पुढे आंदोनल होईल. अंतरवाली सराटीत झालेल्या ग्रामसभेचा आणि आंदोलनाचा काहीही संबंध नाही. आता राज्यात कुठेही आंदोलन होऊ शकते. आंदोलन राज्यात येवला असो वा अंतरवाली कुठेही होऊ शकते.

गावकऱ्यांचा विरोध?

अंतरवाली सराटी गावकऱ्यांनी विरोध केल्याची चर्चा सुरू आहे यावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, 'आधी विरोध झाला आहे. ग्रामसभा घेऊन ठराव देखील झाला आहे. मात्र मी थांबलो नाही. हे आंदोलन येवला किंवा परळी गावातील कुठल्याही ठिकाणी होऊ शकते. पश्चिम महाराष्ट्रात देखील आंदोलन होऊ शकते. मी थांबलेलो नाही. आंदोलन सुरू आहे. अंतरवाली आणि आंदोलन हे समिकरण तुटणार नाही.'

यापुढे अंतरवाली येथे आंदोलन होणार नाही. अंतरवाली येथील हे शेवटचे आंदोलन होतं. ३ वर्षे गावात काढली आहेत. तेथील लोकांनी रक्त सांडलं आहे. ओबीसी बांधवांनी शेती दिली. त्या सर्व गावकऱ्यांचे मी आभार मानतो. आता आंदोलन पाटोदापर्यंत गेलं आहे. ३ महिन्यात काही केलं नाही तर पुढे मुंबईकडे जाऊ.

जरांगे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांची चौकशी करण्यात येणार याबाबत बोलताना म्हणाले की, 'देशात पहिल्यांदाच असं होईल की मराठा आंदोलक जेलमध्ये जातील. जे करायचं आहे ते करू द्या. तीन महिने आम्ही वाट पाहू असं उत्तर दिलं.

Manoj Jarange Patil Antarwali
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, मात्र आंदोलन सुरूच राहणार; शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत काय ठरलं?

अर्जुन खोतकारांवर काय म्हणाले?

अर्जुन खोतकर यांनी पाटील आम्हाला देखील मिशा आहेत असं वक्तव्य केलं होतं. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं. त्यांनी मला ३ महिने काही बोलायचं नाहीये. शिंदे... मित्र पाय तोडू शकतो हे माहिती नव्हते. आपल्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांकडून धोका आहे का? माहिती असलं पाहिजे. समाजाला कळलं पाहिजे की आपला दुष्मन कोण आहे. निवडणुकीत तुम्हाला दिसेल. आपण आपल्या अंगावरच्या खुणा विसरायच्या नाहीत. जे पक्षाला मानतात जातीला मानत नाहीत ते उघडे पडले आहेत. लोकांना दिसले हे खूप चांगले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news