Manoj Jarange Patil : आंदोलन मोडीत काढून एकटे पाडण्याचा डाव

मनोज जरांगे : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन उभारण्याचा इशारा
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patilpudhari photo
Published on: 
Updated on: 

अंबड : मराठा आरक्षण आंदोलन मोडीत काढून आपल्याला एकटे पाडण्याचा डाव सुरू आहे. हे षड्यंत्र रचणारे आपलेच काही लोक असल्याचा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी शुक्रवारी केला. अंकुशनगर येथील निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आंदोलकांवरील कारवाई, कुणबी प्रमाणपत्रे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारवर टीका केली.

आंदोलनाला तीन वर्षे झाल्यानंतर आता आंदोलकांची वाहने, ग्रामसभा व जुन्या नोंदींच्या चौकशा केल्या जात असून, लोकांना घाबरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. ईडी किंवा सीबीआयच्या नोटिसांना आपण घाबरत नसल्याचे सांगत, ‘ज्याला कर नाही, त्याला डर कशाला?’ असा सवाल जरांगे यांनी केला. महाराष्ट्रातील भ्रष्टाचार व बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणांकडेही तपास यंत्रणांनी लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

Manoj Jarange Patil
Chandrashekhar Bawankule : सावकारांनी शेतकर्‍यांना त्रास दिल्यास कारवाई

आधी प्रमाणपत्रे देऊन आता ती राजकीय द्वेषातून रद्द केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. जात पडताळणीसाठी विभागीय आयुक्त स्तरावर सुनावणी घेण्याबाबत उदय सामंत व मंगेश चिवटे यांनी दिलेल्या आश्वासनाचीही त्यांनी आठवण करून दिली. ‘मीसुद्धा जेलमध्ये जाऊ शकतो; पण माघार घेणार नाही,’ अशी भूमिका त्‍यांनी मांडली.

महिलेला ट्रोल केल्याप्रकरणी जरांगेंनी बोलायचे टाळले

अंतरवाली येथील आंदोलनातील सक्रिय महिला कार्यकर्ते ललिता तारक यांनी वेगळी भूमिका मांडल्यानंतर जरांगे समर्थकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून धमक्या व अश्लील पोस्ट केल्याप्रकरणी अकरा समर्थकांविरुद्ध आयटी ॲक्टद्वारे गुन्हे दाखल करण्यात आले आहे याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता या संपूर्ण प्रकरणाबाबत बोलायचे मनोज जरांगे यांनी टाळले आहे हे विशेष.

Manoj Jarange Patil
Strong Bones | गोष्ट हाडे मजबूत करण्याची!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news