Beed Crime | केज तालुक्यात नात्याला काळीमा; आजोळी आलेल्या १३ वर्षीय मुलीवर चुलत मामेभावाकडून तोंड, हात बांधून अत्याचार

केज पोलिसांनी नराधम आरोपीला ठोकल्या बेड्या
Minor Girl Assault Kej
Minor Girl Assault Kej Pudhari
Published on
Updated on

Minor Girl Assault Kej

केज: उन्हाळी सुट्टीत आजोळी मामाकडे आलेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच २५ वर्षीय चुलत मामेभावाने बळजबरीने अत्याचार केल्याची संतापजनक घटना केज तालुक्यातील एका गावात घडली आहे. नराधम आरोपीने मुलीचे तोंड आणि हात बांधून हे कृत्य केले. या प्रकरणी केज पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

घरात एकटी असल्याचे पाहून साधला डाव

माजलगाव तालुक्यातील एका गावात राहणारी आणि आठवीत शिकणारी ही १३ वर्षीय मुलगी २२ मे रोजी तिच्या आत्यासोबत केज तालुक्यातील दैठणा येथे मामाच्या गावी आली होती. २५ मे रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मुलगी घरात एकटीच झोपली होती. याच दरम्यान तिचा २५ वर्षीय चुलत मामेभाऊ तिथे आला. त्याने आजीबद्दल विचारणा केली असता, आजी शेतात सरपण (लाकडे) आणायला गेल्याचे मुलीने सांगितले. घरात कोणी नसल्याचे पाहून तो आत येऊ लागला. मुलीने त्याला विरोध केला, तरीही तो जबरदस्तीने घरात घुसला आणि त्याने आतून कडी लावून घेतली.

Minor Girl Assault Kej
Beed Crime News : खून झालेल्या कामगाराचा मृतदेह थेट पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर

तोंड, हात बांधून अत्याचार आणि जीवे मारण्याची धमकी

दरवाजा बंद केल्यामुळे मुलगी ओरडू लागली, तेव्हा आरोपीने तिचे तोंड रुमालाने दाबून बांधले. तिने सुटका करून घेण्याचा आणि कडी उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने तिला मारहाण करत तिचे दोन्ही हात दोरीने बांधले आणि तिच्यावर अत्याचार केला.

कुकृत्य केल्यानंतर शेतातून आजी परत आल्याची चाहूल लागताच आरोपीने मुलीचे हात सोडले आणि 'कोणाला काही सांगितल्यास जीवे मारून टाकेन' अशी धमकी दिली. त्यानंतर तो अंगावर गोधडी ओढून घरातच एका कोपऱ्यात लपून बसला.

Minor Girl Assault Kej
Beed crime news | बीडमध्ये तरुणाला अमानुष मारहाण करत खून

आजीला धक्का देऊन आरोपी फरार

आजी अंगणात येताच पीडित मुलीने कसाबसा तोंडाचा रुमाल काढला आणि दरवाजा उघडून आजीला हाक मारली. आजी घरात येताच गोधडीत लपलेल्या आरोपीने आजीला जोराचा धक्का दिला आणि तिथून पळ काढला. घाबरलेल्या आजीने तात्काळ या घटनेची माहिती मुलीच्या मामाला आणि आई-वडिलांना दिली.

केज पोलिसांकडून आरोपीला तात्काळ अटक

या धक्कादायक प्रकारानंतर २६ मे रोजी कुटुंबीय केज पोलीस ठाण्यात पोहोचले. पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून २७ मे रोजी रात्री उशिरा आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्याच्या कलम ४ आणि ६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Minor Girl Assault Kej
Beed crime news | "तु मेरे साथ शादी कर, वरना..." ; दबाव टाकत तरुणीचा विनयभंग

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम यांनी रात्रीच आरोपीच्या गावात धाड टाकून त्याला ताब्यात घेतले. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news