Beed crime news | "तु मेरे साथ शादी कर, वरना..." ; दबाव टाकत तरुणीचा विनयभंग

याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Molestation Case
Molestation CasePudhari
Published on
Updated on

परळी वैजनाथ : "तु मेरे साथ शादी कर, वरना भगाके ले जाऊंगा" असा दबाव टाकत धमकी व विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. परळीशहरातील आपना चौक परिसरात एका १८ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Molestation Case
Kej Crime | केज तालुक्यात आंतरजातीय विवाह केलेल्या तरुणीचा विनयभंग

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी ही व्यवसायाने घरकाम करत असून २२ मे रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी अम्रु शेख (रा. आपना चौक, रौफ कॉलनी, परळी) याने फिर्यादी तरुणीला अडवून “माझ्याशी लग्न कर, अन्यथा तुला पळवून नेईन” अशी धमकी दिली. तसेच तिचा हात पकडून ओढत विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Molestation Case
Kej Crime | केज तालुक्यात आंतरजातीय विवाह केलेल्या तरुणीचा विनयभंग

या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२८/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४ व ७८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पो.ह. जाधव हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news