Beed Crime News : खून झालेल्या कामगाराचा मृतदेह थेट पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर

नातेवाईक संतप्त, दुकान मालकावर गुन्हा दाखल, अटकेची मागणी
Beed Crime News
खून झालेल्या कामगाराचा मृतदेह थेट पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरpudhari photo
Published on
Updated on

बीड ः शहरातील नगर रोडवरील एका दारू दुकानात काम करणाऱ्या कामगाराचा शनिवारी (दि.23) मध्यरात्री सुमारास मारहाणीनंतर मृत्यू झाला. उमेश नवनाथ दळवी (वय 38, रा. गोरेवस्ती, बालेपीर, बीड) असे मृत कामगाराचे नाव आहे. दरम्यान दुकान मालकाने बेदम मारहाण केल्यानेच पतीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप मृत उमेश यांच्या पत्नी संगीता दळवी यांनी केला होता. अखेर या प्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरुन दुकान मालकाविरुध्द ॲट्रासिटी ॲक्ट व इतर कलमानुसार 25 मे रोजी पहाटे पावणेतीन वाजता बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मयत उमेश दळवी हे शहरातील नगर रोडवरील एका पत्र्याच्या शेडमध्ये चालविल्या जाणाऱ्या दारु दुकानात मागील दोन वर्षापासून काम करत होते. शनिवारी मध्यरात्री उमेश यांना बालेपीर परिसरातून रुग्णवाहिकेतून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले, मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. मयताच्या पत्नीला ही माहिती फोनवरुन देण्यात आली होती.

Beed Crime News
Chandrapur Crime : पत्नीनेच पतीच्या खुनासाठी दिली सुपारी; चार आरोपी अटकेत

दरम्यान रविवारी सकाळी ही माहिती मिळताच कुटुंबीयांनी रुग्णालयात हंबरडा फोडला. जोपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करून मारेकऱ्याला अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. मृतदेहाच्या अंगावर मारहाणीचे काळे-निळे वळ स्पष्ट दिसत होते. रविवारी सायंकाळी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

Beed Crime News
Jalgaon Crime : जळगाव हादरले! जाचाला कंटाळून पत्नीनेच केली दारुड्या पतीची निर्घृण हत्या, आकस्मिक मृत्यूचा बनाव फसला

दरम्यान या प्रकरणी मयताची पत्नी संगीता दळवी यांच्या फिर्यादीवरुन आरोपी शेख इरफान शेख समद उर्फ लाला (रा.बालेपीर, बीड) याच्याविरुध्द शिवाजीनगर ठाण्यात ॲट्रासिटी कटासह खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

  • उमेश दळवी खून प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करा या मागणीसाठी सोमवारी सकाळी नातेवाईकांनी मृतदेह रुग्णवाहिकेतून थेट पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आणला यावेळी पोलिस अधिकारी यांनी नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र नातेवाईक संतप्त होते. यावेळी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने चुकीचे शब्द वापरण्याची चर्चा घटनास्थळी झाली त्यावेळी नातेवाईक संतप्त झाले होते. अखेर इतर अधिकाऱ्यांनी संतप्त नातेवाईकांना धीर देत त्यांची समजूत काढली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news