Beed crime news | बीडमध्ये तरुणाला अमानुष मारहाण करत खून

मद्यविक्रीच्या दुकानावर होता कामाला; मालकानेच खून केल्याचा नातेवाईकांचा आरोप
Murder Case
Murder CasePudhari
Published on
Updated on

बीड : शहरातील बांगरनाला भागात राहणाऱ्या एका तरुणाचा अमानुष मारहाण करत खून करण्यात आला. शनिवारी रात्री ही घटना घडली. हा तरुण मद्यविक्रीच्या दुकानावर कामाला होता, तेथील मालकानेच त्याचा खून केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बराच वेळ नातेवाईकांनी ठिय्या दिला होता.

Murder Case
Kolhapur Crime : राधानगरीत शेतीच्या वादातून रक्तरंजित शेवट; तरुणाचा धारदार शस्राने निर्घृण खून, भांडण सोडवताना पत्नीवरही हल्ला

उमेश दळवी (34, रा.बांगरनाला, बालेपीर, बीड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो बीड शहरातीलच एका मद्यविक्रीच्या दुकानावर कामाला होता. शनिवारी रात्री त्याने त्याच्या पत्नीला मोबाईलवरुन संपर्क साधत हे लोक मला जीवे मारतील असे म्हटले होते. त्यानंतर रात्री त्याच्या दुकानाच्या मालकाने दळवी यांच्या पत्नीला उमेशची तब्येत ठीक नसल्याचे सांगितले. यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली असता अमानुष मारहाणीत उमेश दळवी याचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

Murder Case
उदगीरमध्ये घरात घुसून मारहाण, दरोडा व जीवे मारण्याची धमकी; सहाजणांविरुद्ध गुन्हा...

या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान पोलिसांनी मात्र या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच गुन्हा दाखल करु अशी भूमिका घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news