बीड : धारूर तालुक्यातील पिंपळवाडा शिवारात २८ किलोचा गांजा जप्त

गांजा जप्त
गांजा जप्त

धारूर, पुढारी वृत्तसेवा : धारूर तालुक्यातील पिंपळवाडा शिवारात गुरुवारी (दि. १२ ऑक्टोबर) रोजी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व पोलीस ठाणे धारूर यांनी संयुक्त कारवाई करत अवैध २८ किलोची गांजा जप्त केला. २८ किलो वजनाचा १ लाख ४४ हजार ५२० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून एकावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील व्यक्तीचे नाव लक्ष्मण जयवंत तिडके ( रा. भोगलवाडी ) असे आहे.

संबधित बातम्या 

तालुक्यातील पिंपळवाडा येथे लक्ष्मण तिडके हे आपल्या फायद्यासाठी शेतात विनापरवाना बेकायदेशीर गांजाची शेती करत असल्याची गुप्त माहिती पंकज कुमावत यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील कर्मचारी बाळासाहेब डापकर, दिलीप गित्ते, अनिल मंदे, गोविंद मुंडे, तसेच धारूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय आटोळे, पोलीस कर्मचारी जमीर शेख, वसंत भताने, यांनी संयुक्तपणे कारवाई केली. या कारवाहीत २८ किलो वजनाचा १ लाख ४४ हजार ५२० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला.

तर लक्ष्मण जयवंत तिडके याच्याविरुद्ध NDPS कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय आटोळे करत आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news