NCP Jitendra Awhad :…म्हणून बापू बापू आहेत; आव्हाडांची सरकारवर बोचरी टीका | पुढारी

NCP Jitendra Awhad :...म्हणून बापू बापू आहेत; आव्हाडांची सरकारवर बोचरी टीका

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांनी किल्ले प्रतापगडावर अफजलखानाचा कोथळा वाघनख्यांद्वारे बाहेर काढला होता. त्यांची ही ऐतिहासिक वाघनखे नोव्हेंबरमध्ये लंडनच्या म्युझियममधून भारतात आणण्यात येणार आहेत. वाघनखे वरुन राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी, ” इंग्रजांचे साधे म्युझियम तुम्हाला रडकुंडीला आणते आहे” असं म्हणतं बोचरी टीका केली आहे. (NCP Jitendra Awhad)

NCP Jitendra Awhad :…म्हणून बापू बापू आहे

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनख महाराष्ट्रात आणण्यासाठी करार झाल्यानंतर त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगू लागल्या आहेत. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ‘X’  अकाउंटवर महात्मा गांधी यांचा संदर्भ देत पोस्ट केली आहे व बोचरी टीका केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,”आपल्याच देशातून नेलेली वाघनखे फक्त काही महिने आपल्याकडे प्रदर्शनाला ठेवायला द्यायला इंग्रजांचे साधे म्युझियम तुम्हाला रडकुंडीला आणते आहे. याच इंग्रजांकडून पंचाहत्तर वर्ष आधी एका उघड्या म्हाताऱ्याने त्यांचा सगळ्यात मोठा गुलाम देश हिसकावून स्वतंत्र केला होता. म्हणून बापू बापू आहे.”

येत्या १७ नोव्हेंबरला साताऱ्यात

छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनख्यांनी किल्ले प्रतापगडावर अफजलखानाचा कोथळा वाघनख्यांद्वारे बाहेर काढला होता. ही वाघनखे 3 वर्षे आपल्या देशात राहणार आहेत. पहिल्यांदा दि. 17 नोव्हेंबर रोजी सातार्‍यात येणार असून, येथे ती वर्षभर छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवली जाणार आहेत. त्यानंतर कोल्हापूर व नागपूर येथेही इतिहासप्रेमींना पाहण्यासाठी ती उपलब्ध होणार आहेत.

हेही वाचा 

Back to top button