सरवडे: पुढारी वृत्तसेवा : कासारपुतळे (ता.राधानगरी) येथील ग्रामपंचायत कर्मचारी अशोक नाना चव्हाण (वय ५९ ) यांचा पाण्याच्या टाकीवरून खाली उतरत असताना शिडीवरुन पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झाली आहे.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मृत चव्हाण हे महादेव मंदिराजवळील ग्रामपंचायत टाकीत नेहमीप्रमाणे टी.सी.एल पावडर टाकण्यासाठी गेले होते.
पावडर टाकून टाकीवरून खाली उतरत असताना शिडीवरून पाय घसरुन ते खाली पडले. त्यावेळी त्यांना उपचारासाठी तत्काळ सोळांकूर ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. रात्री उशिरा शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
हेही वाचा