साहेब! दिवाळी तरी गोड करा; शेतकऱ्याच्या मुलाचे मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र

शेतकऱ्याच्या मुलाचे भावनिक पत्र
शेतकऱ्याच्या मुलाचे भावनिक पत्र

गोरेगाव(हिंगाेली), पुढारी वृत्तसेवा : दसऱ्याच्या दिवशी पुरणाच्या पोळ्या खायला मिळाल्या नाहीत. काही दिवसांवरच दिवाळी सण येऊन ठेपला असून, त्यात गोडधोड खायला मिळावे यासाठी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान द्यावे, असे भावनिक पत्र शेतकऱ्याच्या मुलाने मुख्यमंत्र्यांना लिहीले आहे.

गोरेगाव येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा प्रताप जगन कावरखे याने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. सहावीमध्ये शिकणा-या प्रतापने यावर्षी पावसामध्ये सोयाबीन गेल्याने दसऱ्याला पुरणाच्या पोळ्या खायला मिळाल्या नाहीत, अशी खंत व्यक्त केली आहे.

जुलै महिन्यात पावसाचा जोर कायम होता. ढगफुटी व सततच्या पावसामुळे सर्वत्र शेतजमिनी खरडून गेली. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. बिकट परिस्थितीत शासनाच्या मदतीची अपेक्षा असताना सेनगाव तालुक्यातील चार मंडळे अतिवृष्टी अनुदानातून वगळल्याने शेतकरी चिंतीत झाला आहे.  सणाला पोळ्या तर सोडा पैसेही नाहीत. तसेच जवळील जयपूर गावातील एका शेतकऱ्याच्या मुलाने पैसे मागितल्यामुळे वडीलांनी फाशी घेतली. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सुखी ठेवावे आणि अनुदान लवकर द्यावे, अशी मागणीही या पत्रातून चिमूकल्‍याने केली आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news