

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी येथील औद्योगिक वसाहतीच्या कॉर्नरजवळ दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. कळमनुरी येथील शेख उमर शेख मोहम्मद ( १८ रा. नाईकवाडी मोहल्ला) व शेख मोहम्मद खाजा फैजान उमर फारूक ( २१ रा. आठवडी बाजार) अशी मृत तरुणांची नावे आहेत. दोघे दुचाकीवरून मंगळवारी (दि.४) रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास औद्योगिक वसाहतीकडून कळमनुरी शहराकडे येत असताना हा अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच जमादार भडके, रमेश कुंदर्गे, जाधव, प्रशांत शिंदे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दोघांनाही कळमनुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.अपघातानंतर अज्ञात वाहनचालकाने वाहनासह पळ काढल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचलंत का?