solapur vijapur highway : सोलापूर -विजापूर महामार्गावर भीषण अपघातात चार तरुण ठार | पुढारी

solapur vijapur highway : सोलापूर -विजापूर महामार्गावर भीषण अपघातात चार तरुण ठार

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर-विजापूर महामार्गावरील (solapur vijapur highway) कवठे गावाजवळील ब्रिजला धडकून कारमधील चौघांचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला आहे. हा अपघात आज (दि.०५)पहाटे चारच्या सुमारास झाला. अपघातातील मयत व जखमी हे सर्व कर्नाटकातील आहेत. अरुण कुमार लक्ष्मण (वय 21), महीबूब मोहम्मद अली मुल्ला (वय 18), फिरोज सैफसाब शेख (वय 20), मुन्ना केंभावे (वय 21, सर्व राहणार यरकल केंडी, तालुका सिंदगी, जिल्हा विजापूर, कर्नाटक) अशी अपघातात मृत्‍यू झालेल्‍या तरुणांची नावे आहेत.

solapur vijapur highway : कार ब्रिजला धडकली अन्…

अरुण कुमार लक्ष्मण व इतर जखमी  बुधवारी पहाटे कारमधून  विजापूर ते सोलापूर नवीन महामार्गावरून येत होते. पहाटे चारच्या सुमारास विजापूर महामार्गावरील नवीन कवठे गावाजवळील ब्रिजला कारची धडक बसली. कारमधील सर्वजण गंभीर जखमी झाले.

या अपघाताची माहिती मिळताच सलगर वस्ती पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार आर. ए. जाधव यांनी जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले. चौघांचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टर रोहित पाटील यांनी सांगितले. या घटनेची नाेंद सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचलं का?

Back to top button