परभणी : फुलकळस येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या | पुढारी

परभणी : फुलकळस येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

ताडकळस : पुढारी वृत्तसेवा

फुलकळस येथील एका तरुणाने स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. ही घटना सोमवार १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजण्याच्या दरम्यान घडली. या प्रकरणी ताडकळस पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फुलकळस येथील अभिषेक माधवराव सराटे (वय २१) या तरुणाने स्वतः च्या शेतात आत्महत्या केली. त्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेतला.

घटनेची माहिती मिळताच सपोनि विजय रामोड, पो. हे. काँ. रामकिशन काळे, राठोड, चव्हाण आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ताडकळस प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ वैभव कांबळे यांनी शवविच्छेदन केले. रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्याच्या पश्चात आजी- आजोबा, आई-वडील, १ भाऊ असा मोठा परिवार आहे. या प्रकरणी ताडकळस पोलिस ठाण्यात ज्ञानोबा संभाजी सराटे यांच्या खबरीवरुन आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पो. हे. काँ. रामकिशन काळे हे करीत आहेत. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

Back to top button