Encounter in Pulwama : जम्मू- काश्मीरमध्ये कारवाई सुरुच, पुलवामात एक दहशतवादी ठार | पुढारी

Encounter in Pulwama : जम्मू- काश्मीरमध्ये कारवाई सुरुच, पुलवामात एक दहशतवादी ठार

श्रीनगर : पुढारी ऑनलाईन डेस्क

Encounter in Pulwama : जम्मू- काश्मीरमधील पुलवामातील राजपुरा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत पुन्हा चकमक झाली. या चकमकीत एक दहशतवाद्याला ठार करण्यात आले आहे. या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरु आहे. अशी माहिती काश्मीर झोन पोलिसांनी दिली आहे. (Encounter in Pulwama)

गेल्या सोमवारी पूंछ जिल्ह्यात सुरक्षा दलाने एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता. पोलिस आणि सुरक्षा दलाला दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले होते. या दरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत एक दहशतवादी ठार झाला. या कारवाईदरम्यान घटनास्थळावरुन एक ४७ रायफल आणि अन्य शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता.

गेल्या रविवारी जम्मू- काश्मीरमधील अवंतीपोरा येथे झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला होता.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : भारतीय लष्कराने घडवलेल्या ऐतिहासिक विजयाला 50 वर्षे पूर्ण | 1971 war with pakistan

Back to top button