७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या चुलत्याला २० वर्ष सश्रम कारावास | पुढारी

७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या चुलत्याला २० वर्ष सश्रम कारावास

पैठण; पुढारी वृत्तसेवा : ७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या चुलत चुलत्याला सत्र न्यायालयाने २० वर्ष कारावास व ७३ हजार रुपये दंड ठोठावला आहे.

संबंधित बातम्या : 

पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत २२ सप्टेंबर २०२२ रोजी सात वर्षीय चिमुकलीवर चुलत चुलत्याने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात आरोपी बळीराम सिताराम चव्हाण (वय २५, रा. कडेठाण, ता. पैठण) याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सपोनि जनाबाई सांगळे, पोना संतोष तोडकर, पोना तळपे महिला पोलीस सूर्यवंशी यांनी केला होता. आरोपी विरुद्ध सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. सत्र न्यायालयाने सोमवारी (दि.३०) आरोपी बळीराम चव्हाण याला दोषी ठरवत २० वर्ष सश्रम कारावास व ३० हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास ६ महिने कैद असे वेगवेगळ्या कलमाअंतर्गत एकूण दंडाची रक्कम ७३ हजार रुपये ठोठावली. त्यापैकी ३० हजार रुपये पीडीतेस पुनर्वसनसाठी देण्याचा आदेश न्यायाधीश के. आर चौधरी यांनी दिला आहे. या गुन्ह्याचे सरकारी वकील सुदर्शन शिरसाट यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.

हेही वाचा : 

Back to top button