

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : दिल्लीतील छतरपूर भागातील एका सरकारी शाळेतील अल्पवयीन दहावीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी कॅब चालक आहे, जो पीडितेला शाळेत सोडतो म्हणून आपल्या घरी घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. (Rape On Miner Girl)
फतेपूर बेरी पोलिस ठाण्यात पीडितेचे समुपदेशन केल्यानंतर तिची फिर्याद दाखल करुन घेण्यात आली. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याची ओळख पटली आहे. आरोपीचे नाव रोहित असे असून तो २१ वर्षांचा आहे. (Rape On Miner Girl)
पोलिसांनी सांगितले की, पीडित अल्पवयीन विद्यार्थीनी ही फतेपूर बेरी भागात आपल्या कुटुंबियांसोबत राहते. तसेच ती छतरपूर भागातील सरकारी शाळेत इयत्ता १० वी इयत्तेत शिकत आहे. रोज प्रमाणे ती गुरुवारी (दि.२) कॅबमधून शाळेत जात होती. दरम्यान तिची तब्बेत बिघडल्याने कॅब चालकास तिने घरी सोडण्यास सांगितले. यानंतर कॅब चालकाने पीडितेला तू माझ्या घरी चल आणि तुला बरे वाटू लागल्यावर तुला तुझ्या घरी सोडतो असे सांगितले. कॅब चालकाने पीडितेला आपल्या घरी नेल्यावर तिला नशेचा पदार्थ देत तिला बेशुद्ध केले आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. (Rape On Miner Girl)
पीडित मुलगी शुद्धीत आल्यानंतर याबाबत कोणाला काही सांगितले तर तिला मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या पीडितेने याबाबत कोणालाही काही सांगितले आहे.
असा झाला घटनेचा खुलासा
दरम्यान शाळेतून मुलीच्या घरी फोन गेला. शाळेतून सांगितले गेली की आज तुमची मुलगी शाळेलाच आलेली नाही. यानंतर घरातल्या लोकांनी कॅब चालक रोहितला फोन करुन मुली विषयी चौकशी केली. तेव्हा त्याने सांगितले की तुमच्या मुलीची तब्बेत बिघडल्याने तिला मी माझ्या घरी आणले.
यानंतर मुलीच्या घरातल्यांनी रोहितच्या घरी धाव घेतली. आई – वडिलांना पाहताच पीडित मुलीने तिच्या बरोबर घडलेल्या दुष्कर्माची कहाणी सांगितली. यानंतर मुलीच्या कुटुबियांनी पोलिसांना माहिती देत घटनास्थळी बोलावून घेतले. पोलिसांनी घटनास्थळावरुन आरोपी रोहितला ताब्यात घेतले.
अधिक वाचा :