लग्नाच्या आश्वासनाने शारीरिक संबंध हा बलात्कार नाही; ओडिशा उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय | The Promise Of Marriage Is Not Rape | पुढारी

लग्नाच्या आश्वासनाने शारीरिक संबंध हा बलात्कार नाही; ओडिशा उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय | The Promise Of Marriage Is Not Rape

पुढारी ऑनलाईन डेस्क : लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवणे बलात्कार नव्हे असा मोठा निर्णय ओडिशा उच्च न्यायालयाने दिला आहे. ओडिशा उच्च न्यायालयाने एका प्रकरणात निकाल देत असताना मोठी टिप्पणी केली आहे. यामुळे भुवनेश्वरमधील एका तरुणावर असलेले बलात्काराचे आरोप रद्द करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. (The Promise Of Marriage Is Not Rape)

भुवनेश्वर येथील तरुणावर बलात्काराच्या आरोपावर न्यायालयाची सुणावणी सुरु होती. यावेळी न्यायमूर्ती आर. के. पटनायक यांनी याबाबत निर्णय दिला. दरम्यान, बलात्काराचा आरोप रद्द केला असला; तरी तरुणावरील फसवणूकीच्या आरोपाबाबत चौकशी सुरू राहील. लग्नाचे वचन हे एका विश्वासाने दिले जाते. वचन देऊन काही कारणास्तव ते पूर्ण करू न शकणे आणि सुरुवातीपासूनच लग्नाचे खोटे वचन देणे या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जर सुरुवातीपासूनच लग्नाचे खोटे वचन दिले असेल, तर त्याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. मात्र, या प्रकरणात असे झालेले नाही असे न्यायमूर्तींनी म्हटले.

न्यायमूर्ती आरके पटनायक यांनी आदेशात म्हटले आहे की, याचिकाकर्त्यावरील फसवणुकीसारखे इतर आरोप तपासासाठी खुले ठेवण्यात आले आहेत. आश्वासने सद्भावनेने दिली जातात. वचनाचा भंग आणि लग्न करण्याचे खोटे वचन यात फरक आहे. उच्च न्यायालयाचा या प्रकरणातील हा महत्त्वपूर्ण निर्णय हा ३ जुलैच्या आदेशानुसार देण्यात आला. तसेच यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या सुनावणीचा विचार करण्यात आला.

Back to top button