Pune Rape Case : प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीवर अत्याचार | पुढारी

Pune Rape Case : प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीवर अत्याचार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : प्रेमाच्या जाळ्यात खेचून तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर त्याचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. ही घटना सिंहगड कॅम्पस आंबेगाव बुद्रुक परिसरात फेब्रुवारी 2022 ते अद्यापपर्यंतच्या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी हिंजवडी येथील 24 वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी वैभव बन्सी शरमाळे (वय.24, रा. बोटा, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण हा फिर्यादी तरुणीचा कॉलेजमधील मित्र आहे. त्याने तरुणीला प्रोजेक्ट तयार करायचा आहे, असे सांगून फ्लॅटवर बोलावून घेतले होते. त्यावेळी त्याने तरुणीला ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. आपण लग्न करूया,’ असे म्हणून जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. त्याचे फोटो काढले. पुढे ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत परत त्याच्या व मित्राच्या फ्लॅटवर जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. तसेच फिर्यादी तरुणीच्या घरच्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती.

हेही वाचा

Pune Sex Racket : पुण्यात ऑनलाईन वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; दोन मुलींची सुटका

नाशिकच्या अधोगतीला पालकमंत्री जबाबदार; राऊतांचा भुसे, भुजबळांवर निशाणा

Ajit Pawar : पुणे जिल्हा बँकेत युपीआय सेवा सुरु; अजित पवारांच्या हस्ते शुभारंभ

Back to top button