बीड : मांजरा धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचे आदेश | पुढारी

बीड : मांजरा धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचे आदेश

केज ; पुढारी वृत्तसेवा : पावसाळा संपण्याच्या उंबरठ्यावर आला असून मांजरा धरणाची पाणीपातळी तीस टक्यांपेक्षाही कमी झाली आहे. पाणी आरक्षित कारण्याच्या संदर्भात बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाने संबंधित कार्यालयांना दिल्या आहेत.

संबधित बातम्या 

जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या चार महिन्यात मांजरा धरण क्षेत्रात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे धरण साठ्यात समाधानकारक वाढ झाली नाही. परिणामी, आजमितीस धरणात पाणीसाठा तीस टक्यांपेक्षाही कमी आहे. या धरणाच्या पाणीसाठ्यावर बीड, लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील कृषी क्षेत्र, नागरिकांची तहानच नाही तर औद्योगिक वसाहती देखील अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत पाणीसाठा तीस टक्क्यांपेक्षाही कमी असल्याने तिन्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याच्या सूचना केल्या आहेत.

यामुळे मांजरा धरणावरील पाणी परिस्थितीवर नियंत्रण ठेवणाऱ्या लातूर येथील पाटबंधारे विभागाच्या उपविभाग क्रमांक -१ ने यासंबंधी पाटबंधारे सिंचन शाखा धनेगाव, पाटोदा, सिंदगाव व लातूर या चारही शाखांना धरण व मांजरा नदीवरील सर्व बंधाऱ्यांमधील पाण्याचा अवैध उपसा होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा : 

Back to top button