Pankaja Munde : पंकजा मुंडेंना धक्‍का : वैद्यनाथ कारखान्याची १९ कोटींची मालमत्ता जप्त

file photo
file photo
Published on
Updated on

बीड, पुढारी वृत्तसेवा : भाजप नेत्या पंकजा मुंडे Pankaja Munde यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर केंद्रिय जीएसटी आयुक्तालयाने सहा महिन्यांपूर्वी धाड टाकून काही कागदपत्रे तपासले होते. यामध्ये या कारखान्याने 19 कोटी रुपयांचा बेकायदेशीर जीएसटी कर बुडवल्याचे स्पष्ट झाल्याने काल (रविवार) औरंगाबाद येथील जीएसटी आयुक्तालयाने या कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या कारखान्याच्या चेरमन पंकजा मुंडे आहेत.

केंद्रीय जीएसटी विभागाचे औरंगाबाद येथील आयुक्त कार्यालयाच्या पथकाने वारंवार वैद्यनाथ कारखान्याला जीएसटी कराबाबत नोटीसा दिल्या होत्या. या नोटीशीला प्रत्युत्तर न दिल्याने गेल्या सहा महिन्यांपूर्वी काही अधिकार्‍यांनी या कारखान्याला अचानक भेट देऊन काही कागदपत्रे हस्तगत केली होती. त्यामध्ये या कारखान्याने बेकायदेशीररित्या 19 कोटींचा जीएसटी कर बुडवल्याचे स्पष्ट झाल्याने Pankaja Munde पोलीस बंदोबस्तात कारखान्याचे बॉयलर हाऊस आणि इतर मशिनरी असे मिळून 19 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. या मालत्तेचा लिलाव करून हा कर वसूल करण्यात येणार असल्याचे समजते.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news