बीडच्या पालकमंत्रीपदी धनंजय मुंडे | पुढारी

बीडच्या पालकमंत्रीपदी धनंजय मुंडे

बीड, पुढारी वृत्तसेवा : अखेर बीडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला असून, राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची पालकमंत्री पदी वर्णी लागली आहे. जिल्ह्याला पुर्णवेळ पालकमंत्री नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच तत्कालीन पालकमंत्री अतुल सावे हे विविध कारणांमुळे चांगलेच वादग्रस्त बनले होते.

मागील वर्षी एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्याच्या राजकारणात प्रचंड उलथापालथी होऊन सत्तांतर झाले. यानंतर शिंदे फडणीवस यांचे सरकार सत्तेवर आले. दरम्यान भाजपचे औरंगाबाद येथील नेते अतुल सावे यांच्याकडे बीड आणि जालना या दोन जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कारभार सोपवण्यात आला. मागील वर्षभरात विविध कारणांमुळे सावे हे चांगलेच वादग्रस्त ठरले होते. विशेष करून निधी वाटपात त्यांनी स्थानिकच्या भाजपा कार्यकर्त्यांना डावलून राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना कोट्यवधींचा निधी दिल्याचा आरोप झाला. टक्केवारी घेऊन ते निधी वाटप करत असल्याचेही आरोप त्यांच्यावर झाले. तसेच अतिवृष्टीत झालेल्या नुकसाणीची पहाणी करण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री अतुल सावे फिरकलेच नाहीत. यामुळे पालकमंत्री हटावची मागणीही झाली.

दरम्यान गेल्या काही महिन्यांपुर्वी अजीत पवार गट सत्तेत सहभागी झाला. यानंतर उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचे विश्‍वासू असलेल्या धनंजय मुंडे यांना कृषी खात्याचे मंत्रीपद मिळाले. मुंडे मंत्री झाले तरी त्यांच्याकडे पालकमंत्री पदाची जवाबदारी सोपवण्यात आली नव्हती. अतुल सावेच बीडचे पालकमंत्री असल्याने निर्णय घेताना अनेक अडचणी येत होत्या. विशेष म्हणजे सावे हे फारसे बीडकडे फिरकतही नव्हते. यामुळे धनंजय मुंडे यांची पालकमंत्रीपदी वणी लागावी, अशी मागणी जोर धरत होती. अखेर पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटला असून, बीडच्या पालकमंत्रीपदी धनंजय मुंडे यांची वर्णी लागली आहे. हक्काचा पालकमंत्री मिळाल्यामुळे आता रखडलेली कामे तातडीने मार्गी लागतील असा विश्‍वास सर्वसामन्य जनतेतून व्यक्त होत आहे.

हेही वाचा : 

Back to top button