बीड : करुणा मुंडे, गजानन बोळंगे यांची पदयात्रा केजमध्ये; दुष्काळमुक्तीसाठी मराठवाडा नदीजोड प्रकल्पाची मागणी | पुढारी

बीड : करुणा मुंडे, गजानन बोळंगे यांची पदयात्रा केजमध्ये; दुष्काळमुक्तीसाठी मराठवाडा नदीजोड प्रकल्पाची मागणी

केज; पुढारी वृत्तसेवा : मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त व्हावा यासाठी करूणा मुंडे आणि गजानन बोळंगे यांनी पदयात्रा सुरु केली आहे. दुष्काळ मुक्तीसाठी मराठवाडा नदीजोड प्रकल्प तात्काळ चालू करावा ही मागणी या पदयात्रेत केली आहे. रेणापूर ते मुंबई अशी ही पदयात्रा आहे. आज (दि. १९ ) सकाळी ही पदयात्रा केजमध्ये दाखल झाली.

मराठवाडा कायमचा दुष्कळ मुक्त होण्यासाठी नद्याजोड प्रकल्प आवश्यक आहे. त्या मागणीसाठी स्वराज्य शक्ती सेनेच्या करुणा मुंडे आणि किसान सेनेचे संस्थापक गजानन बोळंगे यांच्या नेतृत्वाखाली रेणापूर ते मुंबई अशी दिंडी सुरु करण्यात आली आहे. आज (दि. १९ ) सकाळी केज येथे ही दिंडी आली होती. या वेळी दिंडीतील कार्यकर्त्यांनी अंगात मागण्यांचे पोस्टर घातले होते. ही दिंडी मुंबई येथील आझाद मैदान ते मंत्रालय पर्यंत पायी संघर्ष यात्रा निघणार आहे. या दिंडीत अच्युत करमुडे, राजकुमार नागरगोजे ,गोविंद आवळे, प्रमोद चिकटे ,संतराम चिकटे ,इलाई शेख ,पांडुरंग केंचे हे सहभागी झाले आहेत.

Back to top button