Maratha Reservation Protest Jalna : जालन्यात मराठा आंदोलनस्थळी संभाजीराजे छत्रपती दाखल | पुढारी

Maratha Reservation Protest Jalna : जालन्यात मराठा आंदोलनस्थळी संभाजीराजे छत्रपती दाखल

अंतरवाली (जालना) : पुढारी वृत्तसेवा – मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation Protest Jalna) मागणीसाठी जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला होता. यानंतर राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. दरम्यान संभाजीराजे छत्रपती हे अंतरवाली सराटी गावात आंदोलनस्थळ‍ी दाखल झाले असून आंदोलनकर्त्यांशी चर्चा सुरु आहे. (Maratha Reservation Protest Jalna)

जालन्यात मराठी आंदोलकांवर पोलिसांकडून अमानुष लाठीमार झाला होता. यात काही नागरिकांसह पोलिसही जखमी झाले आहेत. एवढेच नव्हे, तर आक्रमक आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबाराच्या फैरी झाडल्या होत्या. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी जाळपोळ केली असून, सोलापूर-धुळे महामार्गावर एस.टी. बस पेटवली. चार बसेसवर दगडफेक केली. दरम्यान, आंदोलकांकडून दगडफेच झाल्याचा पोलिसांनी दावा केला आहे.

या आंदोलनाचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले असून बीड, धाराशिव, पाथार्डी, नंदूरबार येथे आंदोलन होत आहेत.

 

Back to top button