Maratha Reservation Protest : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आज शनिवारी जालना जिल्हा दौऱ्यावर | पुढारी

Maratha Reservation Protest : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आज शनिवारी जालना जिल्हा दौऱ्यावर

जालना, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे आज (दि.२) जालना जिल्हा दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटीसह अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात जखमी झालेले आंदोलक व पोलीस कर्मचाऱ्याची भेट घेणार आहेत. (Maratha Reservation Protest )

आंदोलकांसह पोलीस कर्मचारीही जखमी

अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि.१) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास उपोषण स्थळावर पोलीस व आंदोलकामध्ये वाद होऊन लाठीमार व दगदफेक झाली होती. यात आंदोलकांसह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने जखमी झाले होते. त्यानंतर अनेक ठिकाणी जाळपोळ व रस्ता रोको च्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे आज (दि.१) दुपारी एक वाजता आंबड उपजिल्हा रुग्णालयास भेट देणार आहे. त्यानंतर ते अंतरवाली सराटी गावात भेट देणार असून त्यानंतर दुपारी तीन वाजता अंकुश नगर येथील समर्थ कारखाना येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

 

हेही वाचा 

Back to top button