जालना; पुढारी वृत्तसेवा : परतूर ते सातोना रेल्वे स्टेशन दरम्यान असलेल्या उस्मानपूर गावाजवळ रेल्वे रूळावर देवगिरी एक्सप्रेस येण्याच्या वेळेस दगड भरलेला लोखंडी ड्रम उभा करण्यात आला होता. मात्र ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला. आज (दि.६) सकाळच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर रेल्वे पोलिसांच्या तक्रारीवरून आष्टी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेल्वे रूळावर लोखंडी ड्रम असल्याचे लक्षात येताच देवगिरी एक्सप्रेसच्या ड्रायव्हरने सतर्कता दाखवत रेल्वे २३४ ते २३५ किलोमीटर वेगाने असताना इमर्जन्सी ब्रेक लावला. एक्सप्रेस थांबवल्याने मोठा अपघात टळला. घटनेची माहिती ड्रायव्हरने परतूर रेल्वे पोलिसांना कळवताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन हा ड्रम जप्त करत सहाय्यक उपनिरीक्षक परतुर रेल्वे सुरक्षा बल यांच्या तक्रारी वरून आष्टी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.
चौकशी दरम्यान लोखंडी ड्रम परिसरात सुरु असलेल्या रेल्वेचे इलेक्ट्रिकरणाच्या फाउंडेशनच्या कामासाठी आणलेले ड्रम मधील असल्याची माहिती समोर आली आहे. या ड्रममध्ये दगड भरून हा रेल्वे ट्रकवर कुणी ठेवला? या बाबत रेल्वे सुरक्षा दल सहाय्यक उपनिरीक्षक सूर्यकांत साखरे हे तपास करत आहे.
हेही वाचा :