Sharad Pawar : नवी दिल्‍ली महापालिकेने शरद पवारांचे पोस्टर्स, होर्डिंग्स हटवले | पुढारी

Sharad Pawar : नवी दिल्‍ली महापालिकेने शरद पवारांचे पोस्टर्स, होर्डिंग्स हटवले

पुढारी ऑनलाईन डेस्क : नवी दिल्ली महापालिकेने (NDMC) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पोस्टर्स आणि होर्डिंग्स हटवले आहेत. यासंदर्भातील वृत्त ‘एएनआय’ने दिले असून, आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. दरम्‍यान, शरद पवार हे आज (दि.६)  त्यांच्या निवासस्थानावरून पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकसाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. (Sharad Pawar)

Sharad Pawar : राष्‍ट्रवादीच्‍या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार राष्ट्रवादीच्या समर्थक आमदारांसह शिंदे सरकारमध्ये सामील झाले. पवार यांनी रविवारी (दि. २) उपमुख्यमंत्री पदाची शपथ (Ajit pawar latest )घेतली. या घडमोडीमुळे राज्याच्या राजकारणासह महाविकास आघाडीत भूकंप झाला आहे. राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार आणि अजित पवार यांनी मुंबईत पक्षाच्या दोन वेगवेगळ्या बैठका बोलावल्या होत्या. आज  पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. शरद पवार  हे त्यांच्या मुंबईमधील निवासस्थानावरून दिल्लीला रवाना झाले आहेत. दरम्यान, नवी दिल्ली नगरपरिषदेने शरद पवार यांचे पोस्टर्स आणि होर्डिंग्स काढले आहेत.

महाराष्ट्राचे लक्ष राष्ट्रवादीमधील भूमिकेकडे लक्ष लागून राहीले आहे.

हेही वाचा 

Back to top button