Greta Thunberg | पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गला तुरूंगवास होण्याची शक्यता? | पुढारी

Greta Thunberg | पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गला तुरूंगवास होण्याची शक्यता?

पुढारी ऑनलाईन : पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिला तुरूंगवास होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जूनमध्ये स्वीडनमध्ये धरणे निदर्शनादरम्यान पोलिसांच्या आदेशांचे उल्लंघन केल्याचा तिच्यावर आरोप आहे, असे वृत्त ‘द असोसिएट्स प्रेस’ ने दिले आहे. स्वीडनच्या माल्मो शहरात जूनमध्ये पर्यावरण कार्यकर्त्यांनी आंदोलन झाले होते. जीवाश्म वापरावर बंदी घालण्याची मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली होती. यामध्ये २० वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग देखील सहभागी झाली होती.

”ता तिलबाका फ्रेमटिडेन’ या पर्यावरण संरक्षण संस्थेने जूनमध्ये माल्मो येथे निदर्शनाचे आयोजन केले होते. दरम्यान उपोषणादरम्यान आंदोलकांनी माल्मो बंदराचे प्रवेशद्वार रोखले होते. दरम्यान गोंधळ वाढल्याने पोलिसांनी ग्रेटा थनबर्ग आणि इतर आंदोलकांना आंदोलनस्थळ सोडण्यास सांगितले होते. परंतु आंदोलकांनी पोलिसांच्या आदेशाचे पालन करण्यास नकार दिला. यानंतर पोलिसांनी कारवाई करत, ग्रेटा थनबर्ग आणि इतर आंदोलकांवर गुन्हा दाखल केला होता.

Greta Thunberg : सहा महिने तुरुंगवासाची शक्यता?

ग्रेटा थनबर्गविरुद्ध ज्या कलमांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्या कलमांमध्ये ग्रेटाला जास्तीत जास्त सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. ग्रेटाचे वकील चेर्लेट ओटेसेन यांचे असे म्हणणे आहे की, या प्रकरणात ग्रेटा शिक्षेपासून वाचू शकते. याऐवजी तिला फक्त दंड होऊ शकतो. या खटल्याची सुनावणी माल्मो शहरातील न्यायालयात जुलैच्या अखेरीस सुरू होईल, असेही ग्रेटाच्या वकीलांनी सांगितले आहे.

कोण आहे ग्रेटा थनबर्ग

ग्रेटा थनबर्ग एक प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ता आहे. जेव्हा ती केवळ १५ वर्षांची होती, त्यावेळी तिने स्वीडनच्या संसदेबाहेर पर्यावरण रक्षणासाठी आंदोलन सुरू केले होते. दर शुक्रवारी होणाऱ्या ग्रेटाच्या या धरणे-प्रदर्शनांना जगभरात ओळख मिळाली होती. ग्रेटा थनबर्ग हिने सतत सरकार आणि राजकारणी पर्यावरणाच्या प्रश्नाबाबत गंभीर नसल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचा:

 

Back to top button